डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्घंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्घंधी निघून जाते.
– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.

माहितीचा स्त्रोत – लोकसत्ता ३१ – ऑक्टोबर २०१७

Article about : benefits of eating pomegranate in Marathi.

डाळिंब बाग व्यवस्थापन व तेल्या रोगाचे नियंत्रण विषयक चर्चासत्र

डाळिंब बाग व्यवस्थापन व तेल्या रोगाचे नियंत्रण विषयक चर्चासत्र

वक्ते : डॉ. विनय सुपे – महात्मा फुले कृषीविद्यापीठ ,पुणे

सकाळ एग्रोवन – कृषी प्रदर्शन , पिंपरी , पुणे – २५-१०-२०१५

चर्चासत्र ऐकण्यासाठी  खालील यु-ट्यूब वरील वीडीओ पाहावा

यु ट्यूब लिंक :  https://youtu.be/-0GYuWOfdOQ