मुख्यपृष्ठ

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे भारतीय शेतीचे स्वरूप बदलत आहे. डाळींब हे महाराष्ट्रातील एक मुख्य नगदी व फायदेशीर पीक आहे . इतर पिकांच्या मानाने कमी पाण्यावर व कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. डाळींबाचे उगमस्थान इराण असून याची नोंद इ. स. ३५०० मध्ये आढळते.

एकट्या महाराष्ट्रात एकूण देशाच्या डाळींबाच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी ७२ टक्के लागवड आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.डाळींबाचे शास्त्रीय नाव  Punica granatum L  असे आहे. याला मराठीत डाळींब , हिंदीत अनार तर इंग्रजीमध्ये  पोमोग्रेनेट ( Pomegranate ) असे नाव आहे.

हे संकेतस्थळ ( Website : www.dalimb.com ) शेतकरी बांधवांना डाळींब पिका विषयक उपयुक्त माहिती देण्यासाठी विकसित करण्यात येत आहे.
डाळींबाची लागवड , पीक संरक्षण कीड व रोग नियंत्रण , काढणी व विक्री व्यवस्था इत्यादी विषयी माहिती या संकेतस्थळावर आहे.

याशिवाय यशस्वी शेतकरी बांधवांचे अनुभव व मार्गदर्शनपर लेख देण्याचा आमचा प्रयत्न राहील.